मुंबई : देशामधील कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येत सातत्याने बदल होत असून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी (Positivity Rate) रेट कमी होत आहे. त्यामुळे देशासाठी ही आनंदाची बातमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल (Sachin Agrawal) यांनी गुरुवारी पत्रकार परीषदेमध्ये (Press Conference) सांगितले आहे.
त्याचबरोबर मागील 14 दिवसांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे अॅक्टिव रुग्णांची (Active Patients) संख्याही कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी राज्यांनी काळजी घ्यावी, असेही लव अग्रवाल म्हणाले आहेत.
देशात सध्या 96% टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 76% लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
तसेच 15 ते 18 वयोगटातील 65% मुलांनी पहिला डोस घेतला आहे. प्रिकॉशनरी डोसचीही संख्या मोठी आहे. तसेच आतापर्यंत 1.35 कोटी प्रिकॉशनरी डोस देण्यात आले आहेत.
लसीकरणानंतर (Vaccination) मृत्यूचे प्रमाण 10% (91% सहव्याधी) लस न घेतलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 22% (83% सहव्याधी) इतके आहे.
राज्यात एकूण सक्रीय रुग्णसंख्या (7 दिवसांपूर्वी) – 3,02,572 इतकी आहे. राज्यातील आजची सक्रीय रुग्णसंख्या 1,77, 131 इतकी आहे.
सध्या आठ राज्यात सध्या कोरोनाचे 50 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव रुग्ण आहेत. 12 राज्यात दहा हजार ते 50 हजार रुग्ण आहेत.
तर 16 राज्यात 10 हजारांपेक्षा कमी अॅक्टिव रुग्ण आहेत. सर्वाधिक अॅक्टिव कोरोना रुग्ण केरळ, तामिळनाडू कर्नाटक आणि महाराष्ट्रात आहेत.
34 राज्यात साप्ताहिक रुग्णवाढ आणि पॉझिटिव्हिटी रेट घसरला आहे. यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, राज्यस्थानसह इतर राज्यांचा समावेश आहे.
केरळमधील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 47% आहे. तर मिझोरममध्ये 34% आहे. दहा टक्केंपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणारे देशात 297 जिल्हे आहेत.