पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

रुग्णांमध्ये देखील झपाट्याने होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने (Ministry of Health) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सलग दुसऱ्या दिवशी करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

देशात मागील 24 तासांत 16 हजार 167 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर रविवारी दिवसभरात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

याआधी म्हणजेच शनिवारी दिवसभरात 18 हजार 738 रुग्णांना नोंद आणि 40 रुग्णांचा मृत्यू झाला होता. करोना रुग्ण संख्या घटली यासोबत दुसरी दिलासादायक बाब म्हणजे करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

दरम्यान, नव्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात (maharashtra) रविवारी 1812 करोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच राज्यात दिवसभरात एकूण 1675 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे तीन रुग्ण तर बीए. 2.75 चे 16 रुग्ण आढळले आहेत. राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे तीन रुग्ण तर बीए. 2.75 चे 16 रुग्ण आढळले आहे.

यामुळे बीए. 5 व्हेरीयंटची रुग्णसंख्या 275 आणि बीए. 2.75 ची रुग्णसंख्या 250 वर गेली आहे. दरम्यान, नवीन आकडेवारी नुसार करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी आरोग्य विभागासमोर चिंतेचं वातावरण आहे.

आरोग्य विभागाने सुद्धा नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, करोनाच्या नियमांचे पालन करण्याचे देखील आवाहन करण्यात येत आहे.