Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्यांविरोधात मुख्यमंत्र्याकडे तक्रार

राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शिवसेनेच्या नेत्यांच्या तक्रारी काही थांबायला तयार नाहीत.

शिवसेनेच्या आमदाराच्या तक्रारीवरून टाटा रुग्णालयाला दिलेल्या शंभर सदनिकांचा निर्णय रद्द करण्यात आल्यानंतर आता शिवसेनेच्या मंत्री, नेते आणि आमदारांनी त्यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

शिवसेना विरुद्ध आव्हाड संघर्ष

शिवसेना विरुद्ध आव्हाड असा संघर्ष पुन्हा एकदा बघायला मिळतोय. आव्हाड यांच्या कार्यशैलीवर शिवसेना नेते, आमदार आणि मंत्री नाराज आहेत.

Advertisement

यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी आमदार विनोद घोसाळकर,राहुल शेवाळे, सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. याआधी आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि आमदारांनी आव्हाड यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

यापूर्वीही शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी आव्हाडांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली होती.

Advertisement

तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेत आव्हाड यांनी टाटा रुग्णालयाला दिलेल्या सदनिकांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

जयंत पाटील काय म्हणाले?

आव्हाड यांच्याबद्दल जर शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल. याबाबत आव्हाड आणि मुख्यमंत्र्यांची जर चर्चा होणार असेल तर काहीच चुकीचे नाही.

तक्रार ही दुरुस्तीसाठीच असते. तीन पक्ष असल्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, या फार महत्वाच्या आहेत असे वाटत नाही.

Advertisement

तिन्ही पक्ष एकसंघपणे राज्य चालवत आहेत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

 

Advertisement
Leave a comment