टाळेबंदी मागे घेतली असताना आणि राज्यात सर्वंच ठिकाणी कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन व्हेरियंटचे सात रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

आढळला डेल्टा प्लस व्हेरिएंट
रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर येथून घेतलेल्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-2 डेल्टा प्लस व्हेरियंट आढळला आहे. या भागातील अनेक नमुने प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवले आहेत.

हा नवीन व्हेरियंट कितपत धोकादायक आहे, याबाबतचा तपास सध्या सुरू आहे. हा विषाणू डेल्टा किंवा बीटा १.६१७.२ या कोरोना विषाणूमध्ये बदल होऊन तयार झाला आहे.

Advertisement

प्रतिपिंडे करतो निष्क्रिय
डेल्टा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच व्हेरियंट कारणीभूत होता.

उपलब्ध डेटानुसार, हा व्हेरियंट मोनोक्लोनल अँटिबॉडीला निष्क्रिय करतो. या व्हेरियंटवर अजून अभ्यास केला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. इतर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे.

Advertisement

रत्नागिरीत जास्त रुग्ण

राज्यात आढळलेल्या सात डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये पाच रत्नागिरी येथील आहेत. गेल्या आठवड्यात येथील पॉझिटिव्हिटी रेट राज्यापेक्षा जास्त होता.

राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5.8 टक्के असताना रत्नागिरीचा पॉझिटिव्हिटी रेट 13.7 टक्के इतका होता. सर्वाधिक रुग्णवाढ होणाऱ्या महाराष्ट्रातील अव्वल दहा जिल्ह्यामध्ये रत्नागिरीचा समावेश होतो.

Advertisement

हलगर्जीपणा धोकादायक
डेल्टा किंवा बीटा १.६१७.२ व्हेरियंटमध्ये म्युटेशनमुळे नवा डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला आहे. या व्हेरियंटमुळे आजार किती गंभीर होईल हे कळून येत नाही. डेल्टा प्लस किंवा AY.1 या व्हेरियंटवर मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा परिणाम होत नाही.

याची खूप अधिक प्रकरणं समोर न आल्यानं हा अद्याप भारतात चिंतेचा विषय नाही; मात्र हलगर्जीपणा केल्यास कोरोनाचा नवीन व्हेरियंट धोकादायक ठरू शकतो.

Advertisement