Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

महागाई विरोधात काँग्रेसचा मोर्चा

गेल्या काही दिवसांपासून इंधन, स्वयंपाकाचा गॅससह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. त्याविरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर येत आहेत.

गेल्या महिन्यापासून काँग्रेसनं तर वेगवेगळी आंदोलनं केली. आता आंदोलन सप्ताह जाहीर करण्यात आला आहे. त्याची सुरुवात पुण्यातून झाली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा

देशभरातील महागाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करत शहर काँग्रेसनं विभागीय आयुक्त कार्यालयावर सायकल मोर्चा काढला.

पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलन सप्ताहाची पुण्यात सुरुवात झाल्याची घोषणा या वेळी केली.

आठ दिवस आंदोलन करणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा सुरू झाला. बसवराज यांच्या उपस्थितीमुळे पक्षाचे अनेक पदाधिकारी सायकलवर सहभागी झाले होते.

केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आला. तिथे पाटील यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांचीही भाषणे झाली. दरवाढीवर नियंत्रण ठेवून जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकार राज्यातील राजकारण करण्यात गुंतले आहे, त्यांचा निषेध करावा तेवढा कमी असे ते म्हणाले.

पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात सलग आठ दिवस आंदोलन करणार आहे असे या वेळी सांगण्यात आले.

शुक्रवारी आंदोलन

महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना महागाई कमी करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

 

Leave a comment