ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीवर विश्वासघाताचा आरोप !

मुंबईः २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत आमचा विश्वासघात झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करून अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.

विश्वासघात होणार नाही, अशी व्यूहनीती :- शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर मी टीका करणार नाही. कारण तशी जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आलेली नाही. तशी माझी भूमिका नाही,

असे सांगताना पटोले यांच्या टीकेचा रोख मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर होता. 2014 च्या निवडणुकीत जे झाले, तसे 2024 च्या निवडणुकीत होणार नाही, याची दक्षता घेऊनच व्यूहनीती आखली आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजपवर हल्ला करण्याची माझ्यावर जबाबदारी :-  भाजपवर हल्ला करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष असल्याने मी त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्नच नाही.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर थेट हल्ला करत असतो, असे पटोले यांनी सांगितले.

स्वबळावर सत्तेवर येणार ;-  विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचे धोरण पक्षश्रेष्ठी ठरवतील, असे सांगताना पटोले यांनी, आम्ही अनेक वेळा ठेच खाल्ली आहे.

त्यामुळे आता पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे सूतोवाच केले. २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येण्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी पक्षाची व्यूहरचना ठरली आहे, असे त्यांनी सांगितले.

फेरबदलाची चर्चा नाही :- राज्याच्या मंत्रिमंडळातही फेरबदल करण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे,

याबाबत सरकारमधील फेरबदलाची काहीच चर्चा नाही, पक्षश्रेष्ठी त्यावर निर्णय घेतील; मात्र फेरबदलाविषयी आघाडीत चर्चा नाही, मंत्रिपदाची मी कधीही मागणी केली नाही, असे त्यांनी सांगितले

You might also like
2 li