ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

धरण परिसरात संततधार पाऊस, यंदा पाणीसाठा जास्त…

पुणेः गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांच्या परिसरात संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे सध्या चारही धरणांमध्ये सुमारे सात अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे सव्वा टीएमसी पाणीसाठा जास्त आहे.

सरासरी ८५ मिलीमीटर पाऊस :- टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. वरसगाव धरण परिसरात दिवसभर ८४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या धरणात २.१५ टीएमसी पाणीसाठा आहे. पानशेत धरणाच्या परिसरातही संततधार असून, या धरण क्षेत्रात ८५ मिलिमीटर पाऊस पडल्याने या धरणामध्ये ३.४२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

खडकवाला परिसरात कमी पाऊस :- खडकवासला धरण परिसरात पावसाने हजेरी लावली आहे; मात्र अन्य धरणांच्या तुलनेने पावसाचे प्रमाण कमी आहे. या धरण परिसरात ४७ मिलिमीटर पाऊस झाल्याने या धरणामध्ये १.१० टीएमसी पाणीसाठा आहे. टेमघर धरण क्षेत्रात ९५ मिलिमीटर पाऊस पडला असून, या धरणात ०.३९ टीएमसी पाणीसाठा आहे.

यंदा पाणीसाठा जास्त :- गेल्या वर्षीच्या तुलनेत चार प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा हा जास्त आहे. गेल्या वर्षी या दिवशी या धरणांमध्ये ५.७६ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा आतापर्यंत ७.०६ टीएमसी पाणीसाठा असून, धरणांत २४ टक्के पाणी आहे.

‘पवना’मध्येही मुसळधार :- पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोटातही संततधार सुरू आहे. या धरण क्षेत्रात ७४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणात २.५३ टीएमसी पाणी झाला आहे.

You might also like
2 li