पुणे : राज्यातील वाढती कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉनची रुग्णसंख्या (omicron Patients) पाहता जिल्हा आणि राज्य प्रशासन (District and State Administration) सतर्क झाले आहे. कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य ती खबरदारी (Caution) घेण्यात येत आहे.

ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता राज्यातील आणि जिल्ह्यातील रुग्णालये (Hospital) सज्ज करण्यात आली आहेत. तसेच ऑक्सीजनचा (oxygen) तुटवडा भासू नये यासाठीही खबरदारी घेण्यात येत आहे.

पुणे जिल्हा प्रशासन (District Administration) चांगले सतर्क झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील रुग्णालयात १५ हजार ५७५ ऑक्सिजन खाटा, ३ हजार ३३७ अतिदक्षता विभागातील खाटा तर १ हजार ८२५ व्हेटीलेटर सज्ज ठेवण्यात आले आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Patients) वाढत आहे. तसेच यात भर म्हणून पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये ओमिक्रॉनचा सामूहिक संसर्ग सुरु झाला आहे.

जिल्हा आणि राज्य प्रशासनाकडून निर्बंध (Restrictions) लावण्यात येत आहेत. ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या (New Year) पार्श्वभूमीवर नियम कडक करण्यात आले आहेत. राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

येणाऱ्या काळात ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात जवळपास 38 ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट (Oxygen Plant) उभारण्यात आले आहेत.

Advertisement

यातून रोज 11 हजार 89 लीटर पर मिनिट ऑक्सिजनची निर्मित केला जात आहे. जवळपास 3 हजार रुग्णांना 4 लीटर पर मिनिट दराने या ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो.

प्रशासनाकडून कोरोना चाचण्या (Corona test) वाढवण्यात आल्या आहेत. तसेच लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. उच्च शिक्षण विभाग (Department of Higher Education) महाविद्यालये (College) पुन्हा ऑनलाईन सुरु करण्याचे विचार करत आहे.

याबाबत येत्या २ जानेवारीला निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत (Higher Education Minister Uday Samant) यांनी दिली आहे. याबाबत राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुची बैठक पार पाडली आहे.

Advertisement