Abs 2019-nCoV RNA virus - 3d rendered image on black background. Viral Infection concept. MERS-CoV, SARS-CoV, ТОРС, 2019-nCoV, Wuhan Coronavirus. Hologram SEM view.

पुणे : कोरोना विषाणूने (Corona Virus) राज्यात आणि जिल्ह्यात (District) पुन्हा एकदा हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यातच भर म्हणून कोरोनाच नवा व्हेरिएन्ट ओमिक्रॉन (Omicron Variant) हा विषाणू आल्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.

वाढती रुग्ण संख्या पाहता तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कोरोना रुग्णसंख्या (Corona Patients) वाढीचा वेग हा दुप्पट झाला आहे.

तसेच ओमिक्रॉनचा सामूहिक संसर्ग (Omicron Group Infection) सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

Advertisement

याबरोबरच ओमिक्रॉनचे सुद्धा रुग्ण (Omicron Patients) मोठ्या प्रमाणात सापडायला लागले आहेत. मागील ६ दिवसात पुण्यातील रुग्णसंख्येचा आकडा हा धक्का लागणार आहे.

यामध्ये विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात लसीचे दोन्ही (Corona Vaccine) डोस पूर्ण असणाऱ्या रुग्णाची संख्या ही ८० टक्के असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. लास घेतली असली तरी कोरोनाची लागण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

Advertisement

तसेच मास्क चा वापर आणि गर्दीत जाणे टाळण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) करण्यात येत आहे.

पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या (Pune Corona Patients) मागील ८ दिवसात चौपट झाली आहे. ३ जानेवारीला ४४४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकून २८३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Advertisement