पुणे शहरातील संशयित रुग्णांच्या चाचण्याप्रमाणेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या चोवीस तासांत ३९९ नवीन रुग्ण आढळून आले आहे, सक्रीय रुग्णांची संख्या दोन हजारांच्यापुढे गेली आहे. शहरातील एका रुग्णासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण टिकुन आहे. सलग दुसऱ्या दिवशी चारशेच्या आसपास रुग्ण आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील संशयित रुग्णांच्या चाचणीचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या चोवीस तासांत ७ हजार ५८८ जणांची चाचणी केली गेली. यात ३९९ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या रुग्णांची संख्या २ हजार ७० पर्यंत पोचली आहे. सक्रीय रुग्णांपैकी ९२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ६५ जणांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.

Advertisement

शहरात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविल्या गेल्या. याचाचण्या वाढल्या असुन, कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. आढळून येणाऱ्या रुग्णांमधील लक्षणांवर आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येवर महापालिकेचे लक्ष आहे.