मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुलांना बाधा होण्याचे प्रमाण कमी होते; परंतु दुस-या लाटेत मुलांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. एकट्या मुंबईत शून्य ते 1८ वयोगटातील ४६ हजार 633 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेत मुलांना अधिक जपण्याची आवश्यकता आहे.

साडेसहा लाख मुलांना बाधा

मुंबईसह राज्यामध्ये मुलांमधील कोरोना संसर्गाच्या प्रमाणामध्ये हळूहळू वाढ होत आहे. मुंबईचा विचार करता शून्य ते १९ वर्षे या वयोगटातील ४६ हजार ६३३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Advertisement

राज्यामध्ये शून्य ते दहा वर्षे या वयोगटामध्ये एक लाख ९६ हजार ६५१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ११ ते २० या वयोगटामध्ये ४ लाख ५४ हजार २९९ तरुण राज्यात बाधित असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. एकत्रितरित्या ही संख्या ६ लाख ५० हजार ९५० इतकी आहे.

तरुणांत संसर्गाचे प्रमाण जादा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोना संसर्गाची लागण अधिक होण्याची वैद्यकीय शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या रुग्णसंख्येवर विशेषत्वाने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे बालरोगतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. मागील काही दिवसांमध्ये स्थिर असलेल्या या संख्येमध्ये थोडी वाढ दिसून येते.

Advertisement

संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. मनोज मोकळे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की मागील नऊ-दहा महिन्यांमधील कोरोना रुग्णसंख्येमधील चढ-उतार लक्षात घेतले, तर त्यात तरुणांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते.

ज्येष्ठांना संसर्गाचे प्रमाण कमी

लसीकरणानंतर ज्येष्ठ नागरिकांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र बाहेर कामानिमित्त जाणाऱ्या तरुणांमध्ये हे प्रमाण कमी झालेले नाही. त्यात मोठ्या प्रमाणात वाढ नसली, तरीही प्रमाण कमी झाल्याचेही दिसत नाही.’

Advertisement