पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

रुग्णांमध्ये देखील झपाट्याने होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने (Ministry of Health) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील 93 जणांना करोना संसर्गाचे निदान झाले.

मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना (corona) सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मंगळवारी दिवसभरात आढळलेल्या 93 नवीन रुग्णांपैकी 40 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. 39 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर 14 रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत.

पुणे शहरातील एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला आहे. मंगळवारी आढळलेल्या 93 नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या 15 लाख दोन हजार 721 एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील 518 रुग्णांवर करोनाचे उपचार सुरू आहेत.

करोना रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास पुन्हा एकदा निर्बंध घातले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी काळजी घेतल्यास करोना वाढणार नाही असं सुद्धा आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे.

दरम्यान, विषाणूचा संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.