पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

सध्या रुग्णांमध्ये (Corona Update) चढउतार होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासांत करोना रुग्णांची (Corona Update) संख्या किंचित वाढली आहे. बुधवारी दिवसभरात 6 हजार 395 नवे करोनाबाधित आढळले आहेत.

याच्या आदल्या दिवशी (मंगळवारी) 5,379 करोनाच्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेनं 1,016 रुग्णांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात वाढती रुग्णसंख्या ही चिंतेचं कारण आहे.

तर दुसरीकडे गेल्या 24 तासांत देशात 6 हजार 614 रुग्ण करोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. दिवसभरात आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

तसेच आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1094 नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर 1747 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 एवढे झाले आहे. राज्यात पाच करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

तर दुसरीकडे आजपर्यंत 79,52,049 करोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे करोना रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

तसेच, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे देखील सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.