पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

रुग्णांमध्ये देखील झपाट्याने होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात करोनाचे 20,038 नवीन रुग्ण आढळले आहेत.

तर, 16,994 लोक करोनापासून बरे (Coronavirus in India) झाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रशासनाची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे.

त्याचवेळी गेल्या 24 तासांत कोरोनामुळं 47 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाच्या एकूण सक्रिय प्रकरणांबद्दल बोलायचं झाल्यास, ही संख्या 1,39,073 आहे तर सकारात्मकतेचा दर 4.44% टक्क्यांवर पोहोचला आहे.

तर दुसरीकडे राज्यात काल (गुरुवार) 2229 करोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात एकूण 2594 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

मुंबईत सध्या 3318 सक्रिय रुग्ण (Active Patient) आहेत. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला.

तर आतापर्यंत राज्यामध्ये 78, 47, 894 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.95 टक्के इतकं झालं आहे.

तसेच, पुणे शहरात (Coronavirus in Pune) देखील दररोज सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असून, पुणे शहराच्या हद्दीत 566 आणि पिंपरी चिंचवड शहरात 220, पुणे ग्रामीण 159 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.