पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

सणासुदीसोबतच देशात करोना महामारीची लाट पुन्हा येण्याचा धोकाही वर्तवला जात आहे. दुसरी लाटही अशीच सणासुदीच्या (diwali) काळातच आली होती. सध्या रुग्णांमध्ये देखील चढ-उतार होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे.

त्यामुळे आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ऐन सणासुदीच्या काळात पुणे शहर (pune city)आणि जिल्ह्यातील (pune gramin) करोना बाधितांची संख्या समोर आली आहे.

मागील तीन दिवसांत राज्यातील 972 नवीन रुग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 201 रुग्णांचा समावेश आहे. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाकडून दिवाळीच्या तीन दिवसांनंतर गुरुवारी दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

त्यामध्ये याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, गुरुवारी पुणे जिल्ह्यातील 40 नव्या रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला. त्यांपैकी 26 रुग्ण पुणे महापालिकेत, 10 रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये तर उर्वरित चार रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या 15 लाख 36 हजार 38 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. नव्याने आढळत असलेल्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत,

मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुखपट्टीचा वापर, वर्धक मात्रेसह लसीकरण पूर्ण करणे या बाबी महत्त्वाच्या असल्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॅा. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले आहे.

नवीन विषाणूचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी :

1. तापासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

2. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.

3. सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वावरा

4. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण.

5. अगोदरच आजारी असलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना अधिक खबरदारी घेणे

6. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सार्वजनिक संपर्क टाळावा.