ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

वारी होत नसल्याने कोरोनात वाढः संभाजी भिडे

संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधाने हे जणू समीकरणच झाले आहे. त्यांनी विवादास्पद विधाने वारंवार केली आहेत. आषाढी वारीत तलवारी घेऊन घुसण्याचा त्यांचा प्रयत्न वारक-यांनीच हाणून पाडला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत पायी वारीला परवानगी द्या

आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली.

वारीला परवानगी देण्याची मागणी करण्यासाठी भिडे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन दिलं.

मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

कोणत्या शहाण्याने मास्कचा सिद्धांत काढला ?

दारुच्या दुकानात जाणाऱ्या तरुणांना पोलिस अडवत नाहीत; पण मुखपट्टीविना फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड केला जातो, असं भिडे यांनी म्हटलं आहे. भिडे यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

“कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असं ते म्हणाले होते. हातावरची माणसं उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही.

व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचं काम सुरु आहे, असं सांगून कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.

प्रजा भंपक आणि बावळट

कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, तो घेईल , सरकारने यात लक्ष घालू नये.

सरकारने पारदर्शक कारभार करावा, लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायचे गांजा, मटका अफू सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद, असं संभाजी भिडे म्हणाले.

 

You might also like
2 li