कोरोनावर विजय मिळवायचा असेल तर लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतामध्ये कोविडशिल्ड आणि कोवॅक्सीन लसीचे डोस देण्यात येत आहेत. पण पुण्यात एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे तुम्ही चकित व्हाल.

पिंपरी चिंचवड मध्ये एका आजींना पहिला डोस कोव्हिडशील्ड देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या डोससाठी पण रजिस्ट्रेशन केले. आजींना आलेल्या मेसेजनुसार त्यांना तुकाराम नगर येथील लसीकरण केंद्रावर नेण्यात आले.

आजींना पहिला डोस कोव्हिडशील्डचा देण्यात आला आणि आता नंतर त्यांना कोवॅक्सीनचा दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आता यामुळे नातेवाईकांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Advertisement

याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पण करण्यात आली आहे. अशी घटना इतरांच्या बाबतीत घडू नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पण करण्यात आली आहे.

याप्रकरणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित परिचारिकेवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यांनी आजीच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पण केले आहे.

Advertisement