पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला असून, करोना महामारीची लाट पुन्हा येण्याचा धोकाही वर्तवला जात आहे.

नुकतंच समोर आलेल्या अहवालानुसार, करोना विषाणू हा हवेतून (Sars CoV 2) पसरतो हे सिद्ध झालं असून हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं आहे. करोना विषाणू (Covid 19) हा प्रामुख्याने वॉटर ड्रॉपलेट्सद्वारे पसरतो, असं मानलं जात होतं.

एखादी जवळची व्यक्ती तुमच्यासोबत संपर्कादरम्यान खोकल्यामुळे, शिंकण्यामुळे किंवा बोलताना नकळत बाहेर पडणाऱ्या थुंकीद्वारे कोरोना विषाणू पसरतो, असं आतापर्यंत मानलं जातं होतं.

पण आता एका संशोधनातून समोर आलेल्या अहवालानुसार, करोना विषाणू हवेतून पसरतो, यावर जागतिक आरोग्य संघटनेनंही शिक्कामोर्तब केला आहे.

जगभरात 2020 साली करोनाचा कहर पाहायला मिळत होता. करोना विषाणू संसर्ग अधिकच वाढला होता. करोना विषाणू खोकताना किंवा शिंकताना थुंकूतून पसरतो, असं यावेळी समोर आलं होतं.

यानंतर वैज्ञानिकांच्या एका चमूने करोना विषाणूबाबतची माहिती पुन्हा तपासण्यास सुरुवात केली. यामध्ये शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की, करोना विषाणू फक्त खोकताना किंवा शिंकताना वॉटर ड्रॉपलोट्समधून नाही, तर हवेतूनही पसरतो. असं सिद्ध झालं आहे.

वैज्ञानिक काय? म्हणतात पाहा….

लिन्सी मार ( Linsey Marr ) एक एरोसोल शास्त्रज्ञ म्हणजे हवेतील लहान कणांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञ आहेत. लिन्सी आणि त्यांच्या टीमने कोरोना विषाणूबाबतच्या संशोधनाचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेसमोर मांडला.

या संशोधनात करोना विषाणू वॉटर ड्रॉपलेट्समधून पसरत असल्याचा म्हणजेच वॉटर ड्रॉपलेट-एरोसोल डिकोटॉमीचा पुनर्विचार केला आणि या संशोधनातून नवीन माहिती स्पष्ट झाली आहे.