वर्धा : आपल्या बॉयफ्रेंडला (Boyfriend) मेसेज (Message) केल्याच्या वादातून १६ वर्षीय मुलीने तिच्या कथित ‘बॉयफ्रेंड’च्या मदतीने १५ वर्षीय मुलीला मारहाण केल्याचा धक्कादायक (Shocking) प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) जखमी मुलीचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.
तू माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलेस? असे बोलत या मुलीने १५ वर्षीय मुलगी शिकवणीमध्ये बसून असताना १६ वर्षीय मुलीच्या ‘बॉयफ्रेंड’चा फोन आला.
शिवीगाळ करुन धमकी देत त्याने पीडितेला आयटीआय टेकडी (ITI Hill) परिसरात बोलवले. अल्पवयीन मुलगी भीतीपोटी तिथे गेली असता तिला दुसऱ्या मुलीने शिवीगाळ केली.
तसेच तू माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलेस? असे बोलत तिने १५ वर्षीय मलीला तिच्या कथित बॉयफ्रेंड सोबत मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये पीडित मुलगी जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
याप्रकरणी पीडित मुलीचा जबाब घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप (Sub-Divisional Police Officer Piyush Jagtap) यांनी तात्काळ रामगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. व सदर घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नकळत्या वयात होणारी प्रेम प्रकाराणे (Love Affair), विरह, दुरावे, ब्रेक अप आणि त्यातून वाढणारी भांडणे, वादावादी आणि गुन्हेगारी वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात अल्पवयीन मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असून पालकांनी मुलांकडे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.