जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर)येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याला ट्रॅक्टर व लेबर पुरविण्याबाबत करार करून घेऊन कारखान्याकडून पैसे घेऊन देखील ट्रॅक्टर ट्रोली व लेबर न पुरविता फसवणूक केली.

याबाबत कारखान्याचे काम पहाणारे अशोक पांडुरंग जाधव (वय ४९ रा. अमृतवेल सोसायटी शिक्रापूर)यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एकनाथ चेरसिंग जाधव (रा.खेर्डे,ता.चाळीसगाव)या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याला दहा ट्रॅक्टर, ट्रोली व लेबर पुरविण्याबाबतचा ठेका ठेकेदार एकनाथ जाधव यांनी घेतला होत.

Advertisement

यावेळी सदर ठेक्याबाबत करारनामा करण्यात आलेला असताना साखर कारखान्याकडून जाधव यांना चार लाख रुपये उचल स्वरुपात देण्यात आलेले होते. मात्र जाधव यांनी साखर कारखान्याला कोणतेही ट्रॅक्टर, ट्रोली व लेबर दिले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहेत.