Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

परांजपे बिल्डरविरोधातील गुन्हा काैटुंबिक कलहातून

बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. पैसे घेऊनही वेळेत ताबा न दिल्याने गुन्हे दाखल झाले; परंतु पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना काैटुंबिक कलहामुळे अटक झाली आणि त्यांची चाैकशीनंतर सुटकाही झाली.

परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते; मात्र शशांक परांजपे आणि श्रीकांत परांजपे या परांजपे बंधूंची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे.

याबाबत परांजपे कुटुंबातील सदस्य आणि कंपनीचे संचालक अमित परांजपे यांनी एक व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याबद्दल तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.

याबाबत वसुंधरा डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली होती.

वारसाला अंधारात ठेवून जमिनीची विक्री

वसुंधरा डोंगरे यांच्या तक्रारीवरुन विलेपार्ले पोलिस ठाण्यात कलम 476, 467, 68, 406, 420 आणि 120 ब अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.

तक्रारदार या वारस असतानाही त्यांच्या कोणतीही माहिती न देता जमिनीची विक्री करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर वसुंधरा डोंगरे यांनी रितसर पोलिसात तक्रार केली होती.

परांजपे बंधूंकडून नेमकं स्पष्टीकरण काय ?

“परांजपे कुटुंबीयांच्या मिळकतीतील हिस्स्यावरुन कुटुंबातीलच एका व्यक्तीने गैरसमजुतीतून विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या संदर्भात श्रीकांत, शशांक तसेच त्यांच्या काही चुलत भावंडांनादेखील त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी मुंबई येथे बोलावण्यात आले होते. तक्रारदार व्यक्तीखेरीज परांजपे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आहेत”, अशी भूमिका अमित परांजपे यांनी मांडली.

Leave a comment