वादग्रस्त वक्तव्य आणि कायद्याला कायम दुय्यम लेखण्यामुळं शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे कायम वाद ओढवून घेत असतात.

पुण्यात तलवारींसह वारीत घुसण्याचा त्यांचा प्रयत्न असाच वाद झाला होता. आता कराडमध्ये बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी त्यांच्यासह ऐंशी जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कराड शहरात बेकायदेशीरपणे जमाव जमवून रॅली काढल्याप्रकरणी कराड पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

Advertisement

मंदिर प्रवेश, मास्क न लावणे आणि कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देश व आदेशाचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

बंडातात्यांच्या समर्थनार्थ रॅली

संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या पोलिस कारवाईच्या विरोधात कराडमध्ये रॅली काढली.

बंडातात्या यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करत पायी दिंडीला जाण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांना कराडमध्ये त्यांच्या आश्रमशाळेत स्थानबद्ध करण्यात आलं.

Advertisement

या कारवाईच्या विरोधात आणि पायी वारीच्या समर्थनासाठी शिवप्रतिष्ठान संघटनेने भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढली. तसंच आपल्या मागण्यांचं निवेदन कराडच्या तहसीलदारांना दिलं. यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

नेमंक काय झालं ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी केलेल्या निर्देशांचे व आदेशांचे उल्लघंन केल्याप्रकरणी भिडे यांच्यासह 70 ते 80 धारक-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लघंन करुन त्यांनी कराड शहरात बेकायदा जमाव जमवून रॅली काढली. मंदीर प्रवेश बंदी असतानाही मंदीर उघडून मंदिरात प्रवेश केला.

Advertisement

साईबाबा मंदीर उघडून आत बसले

शासनाने बंडातात्या कराडकर यांच्यासह वारक-यांना वारीसाठी परवानगी द्यावी. या मागणीला समर्थन देत संभाजी भिडे कराडमधील दत्त चौकात आले.

या वेळी त्यांच्यासह शिवप्रतिष्ठानच्या 70 ते 80 धारकरी बंद असलेले साईबाबा मंदीर उघडून आत बसले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले.

 

Advertisement