पिंपरी चिंचवड – पूर्व वैमनस्यातून तरुणाचा टोळक्याकडून कोयत्याने वार (Crime) करत पवन लष्करे याचा खून करण्यात आला आहे. ही घटना मोशी येथे 25 ऑक्टोबर रोजी अकराच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच दहशद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऐन दिवाळीच्या (Diwali) दिवशी हा प्रकार घडल्याने नागरिक देखील भीतीच्या वातावरणात राहत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्याचा मित्र पवन लष्करे व करण वंजारे हा मोशीतील (Moshi News) शिवरस्ता येथील सीएनजी पंपाजवळ उभे होते.

यावेळी सुरज व पवन याच्याशी झालेल्या जुन्या वादातून आरोपींनी (Crime) फिर्यादी व सुरज याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच, पवन याच्यावर कोयत्याने व पालघन याने डोक्यात वार करत खून केला.

तसेच फिर्यादी याच्यावर कोयत्याने वार करत तर वंजारेला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत जखमी केले. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (Bhosri Police) सोन्या उर्फ परशुराम जाधव (वय 21 रा.चिंचवड), गणेश शिंदे (वय.22 रा. चऱ्होली), साहिल म्हस्के (वय 22 रा.चिंचवड) व

राजू दोडमाने (वय 22 रा.पिंपरी) अशी अटक आरोपींची नावे असून अत्रय काळे (वय 23 रा.चाकण) 4 ते 5 अनोळखी इसम व एका अल्पवयीन मुलावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुरज रामदास मोहिते (वय 21 रा.चिंचवड) याने फिर्याद दिली होती. दरम्यान, यापूर्वी देखील पुणे शहर आणि पिंरी चिंचवड परिसरात या प्रकारचे हल्ले झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सध्या तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या वाटेवर चालत असून, लहान-मोठ्या वादामधून अश्या प्रकारचे गंभीर गुन्हे या तरुणांच्या हटवून हातून घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.