पुणे – पुण्यातील (Pune News) मध्यवर्ती भागात असलेल्या महात्माफुले मंडई (pune mandai) परिसरात एक मोठी घटना घडली असून, या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहे. मंडई (pune mandai) परिसरात एका महिलेला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण (Crime news) करण्यात आली आहे. एका पोलीस (Pune Police) शिपायाने ही मारहाण केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शिंगे असे या पोलिस शिपायाचे (Pune Police) नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांचा मंडई परिसरात बांगडी विक्रीचा व्यवसाय आहे तर आरोपी राहुल शिंगे खडक पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई आहे. मंडई चौकीजवळ असलेल्या नळकोंडाळ्याजवळ शिंगे यांनी दुचाकी लावली होती.

दुचाकीमुळे अडथळा होतो. त्यामुळे ती नीट लावा, असे फिर्यादी यांनी शिंगे यांना सांगितले. या कारणावरून शिंगे यांनी महिलेला बेदम मारहाण केली.

या प्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर शिंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम निंबाळकर या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. या ५० वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या महिलेचा मंडई परिसरात बांगडी विक्रीचा व्यवसाय आहे. तर, आरोपी राहुल शिंदे खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई आहे. दरम्यान, पोलिसांच्या या अरेरावीमुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या पूर्वी देखील पुणे शहर आणि इतर परिसरात अश्या प्रकारच्या मारहाणीच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नागरिकांचे रक्षण करणारेच पोलीस आता सामान्य नागरिकांवर हात उचलत असून, नागरिकांकडून देखील संतप्त प्रतिक्रिया येत आहे.