पुणे – पुणे शरातील धायरी (Dhyari pune) परिसरात एका नामांकित हॉटेल व्यवस्थपक तरुणाच्या डोक्यात वार करुन हत्या (Murder) केल्याची घटना काही दिवसांपूर्वी झाली होती. ही घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण धायरी परिसरात एकच खळबळ उडाली, सामान्य नागरिक देखील भीतीच्या सावटाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे. भरत भगवान कदम (वय 24, रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी, पुणे) असे मृत (Murder) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मात्र, आता या खुनाचा पोलिसांनी तात्काळ छडा लावला आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची धक्कादायक माहिती तपसात उघडकीस आली आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

गारवा हॉटेलचा मॅनेजर भरत भगवान कदम (वय- 24 ) रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावर निर्मिती असोसिएटस बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या मोकळ्या जागेत हल्लेखोरांनी भरत कदम यांना अडविले.

आणि त्यांच्या डोक्यात हत्याराने वार केले, त्यात ते गंभीर जखमी झाले आणि खाली पडले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळातून पळून गेले. मात्र, यावेळी भरत कदम यांचा जीव गेला होता.

या प्रकरणी भरत यांचा भाऊ प्रकाश कदम यांनी तक्रार आहे. अनिकेत अरुण मोरे (वय 25 वर्षे रा. धायरी पुणे), धीरज शिवाजी सोनवणे (वय 19 वर्षे रा.कोथरुड पुणे), सनी उर्फ योगेश हिरामण पवळे (वय 19 वर्षे रा. कोथरूड पुणे) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचा तपास केला.

त्यावेळी यातील मयत भरत कदम व आरोपी अनिकेत मोरे हे एकमेकांचे ओळखीचे असुन याच्यामध्ये सुमारे चार ते पाच महिन्यापूर्वी एकाच महिलेवर असलेल्या प्रेमसंबधाच्या अनुशंगाने झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी याने त्याचा मावस भाऊ धीरज सोनवणे व त्याचे मित्र याचे करवी मयताचा खुन केल्याचे निष्पन्न झाले.

सदरची कामगिरी ही अमिताभ गुप्ता पोलिस आयुक्त, संदिप कर्णिक पोलिस सह आयुक्त राजेंद्र डहाळे, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेक्षिक विभाग,

पोर्णिमा गायकवाड पोलिस उप-आयुक्त, परि 3, सुनिल पवार, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश संखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जयंत राजुरकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सचिन निकम इत्यादींनी केली आहे.