पुणे – व्हॉट्सअॅप स्टेटस ( Whatsapp Status) ठेवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सराईत गुन्हेगार पवन लष्करे याच्या खुनाचा बदला घेण्याबाबत, त्याच्या एका मित्राने ‘तेरी मौत का बदला हम जरूर लेंगे,’ असे स्टेटस (Whatsapp Status) सोशल मीडियावर ठेवले होते. मात्र, हेच स्टेटस या तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं असून, पोलिसांनी त्याला अटक (Crime news) केली आहे. अर्जुन भीमराव वंजारी (वय २४, रा. शरदनगर, चिखली) असं या अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

तर, दुसरीकडे त्याचा साथीदार आतिष काळे याच्या विरोधात गुन्हा (Crime news) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मोहसीन शेख यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार पवन लष्करे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या टोळीतील अतिश काळे याने एक व्हिडिओ बनवला,

त्यात ए दोस्त अपनी दोस्ती की मिसाल एक ना एक दिन जरूर देंगे, चाहे कितने भी दिन गुजर जाए तेरी मौत का बदला हम जरूर लेंगे, असा मजकूर होता.

तो व्हिडिओ अर्जुन वंजारी याने स्टेट्सला ठेवला होता. तो निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या पिंपरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत. तरुणाईचा कल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढत असताना,

तरुण मुलं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत असतात परंतु यासाठी सोशल मिडियावर कोयता, तलवार,पालघन इत्यादी हत्यारे हातात घेऊन,

छायाचित्रिकरण करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करत दहशत निर्माण करणाऱ्याचा प्रयन्त करत असतात. अश्या तरुणांवर पोलीस देखील कडक कारवाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या पुणे शहर आणि परिसरात दिवसेंदिवस असे अनेक तलवार भाई तयार होत असून, भर चौकात धिंगाणा घालत आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार पाहायला मिळाले आहेत.

त्यामुळे सामान्य नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे. तर, यावर प्रतिबंध आणण्यासाठी पोलिसांनी विशेष अभियान चालविले पाहिजे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.