पुणे – लग्नाचे (Marriage) आमिष दाखवून एका महिलेवर दोन वर्ष वारंवार अत्याचार (Sexual Relations) करण्यात आले. त्यानंतर स्वत: लग्न करून त्या महिलेला लग्न (Marriage) करण्यास नकार दिला. आणि जेव्हा पीडित महिला जाब विचारण्यासाठी गेली असता तिला मारहाण आणि शिवीगाळ (crime) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) शहरात घडली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस (pune police) स्टेशन अंकित म्हाळुंगे चौकीत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा (crime) नोंद करण्यात आला आहे.

म्हाळुंगे पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. भगवान राम बिरादार (२७ वर्ष रा.लातूर ) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, भगवान राम बिरादार आणि पीडित महिला एकाच कंपनी मध्ये कामाला होते. दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि आरोपीने लग्नाचं आमिष दाखवत पीडितेवर जुलै २०२० पासून वारंवार अत्याचार केले.

त्यानंतर पीडितेल आरोपीने दुसरं लग्न केल्याची माहिती मिळाली होती. आणि जेव्हा पीडित महिला आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली असता आरोपीने तिला शिवीगाळ करत मारहाण करून दमदाटी करण्यात आली.

त्यांनतर पीडितेने म्हाळुंगे चौकीत गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी तात्काळ आरोपीला पकडण्यासाठी दोन पथक रवाना केली.

पोलिसांना आरोपी त्यांच्या मूळगावी लातूर जिल्ह्यात मिळून आला असून, भगवान राम बिरादार याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या पूर्वी देखील अश्या अनेक घटना पुणे शहर आणि इतर परिसरात घडल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसत आहे.