उत्साह आणि आनंद कधीकधी नडतो, हे हटके लग्न करणा-या नववधूला आता चांगलेच कळले असेल.

करायला गेलो एक आणि झाले भलतेच असे आता तिच्यासह व-हाडी मंडळींनाही वाटले. बोनेटवरची वरात आणि पोलिसांच्या दारात याचा प्रत्यय आल्याने नववधूसह सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

व्हिडिओ नका करू व्हायरल

हटके लग्न करण्यासाठी घरातून विवाहस्थळी गाडीच्या बोनेटवर बसून जाण्याचे धाडस नववधूच्या चांगलेच अंगलट आले आहे.

Advertisement

तिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मनस्ताप झालेल्या मुलीच्या आई व मामाने आता हा व्हिडिओ व्हायरल न करण्याची साद घातली आहे.

चर्चा झालेली बोनेटवरची वरात

स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर बसून नववधू लग्नाला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या आगळ्या वेगळ्या वरातीची चांगलीच चर्चा झाली. हा आनंद क्षणतभंगूर ठरला.

पोलिसानी गुन्हा दाखल केल्यानंतर, “आनंदाच्या भरात हा व्हिडीओ शूट केला होता, आता व्हायरल करू नका” अशी विनंती मुलीची आई आणि मामा करत आहेत.

Advertisement

वधूसह कारचालक, व्हिडिओग्राफर आणि गाडीतील इतर वऱ्हाड्यांवर ही पोलिसांनीकारवाईचा बडगा उगारल्यानें संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

वरातीने झाली डोकेदुखी

वधूच्या वडिलांचे १६ वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हा ती सहा वर्षांची होती. मी तिला मोठ्या कष्टाने तिला मोठे केले.

मुलीच्या लग्नाच्या आनंदात केलेला हा व्हिडिओ डोकेदुखी ठरेल, असे आम्हा कुटुंबीयांना वाटले नाही, असे सांगून कोणालाही त्रास द्यायचा आमचा उद्देश नव्हता. उत्साहाच्या भरात तो व्हिडिओ शूट केला. तो व्हायरल करू नका,” अशी विनवणी आईने केली आहे.

Advertisement

नेमकं काय घडलं ?

तरुणीचा विवाह सासवड (ता. पुरंदर) परिसरातील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात होता. लग्नासाठी जाताना उत्साहाच्या भरात ती दिवे घाटातून चक्क कारच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास करत होती.

या विषयी माहिती मिळताच पोलिस सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास तिथे पोहोचले. त्या वेळी नववधू कारच्या बोनेटवर बसली होती, तर इतर वऱ्हाडी गाडीत बसले होते.

पोलिसात गुन्हा दाखल

या प्रकाराचे व्हिडीओ शूटिंग करण्यात येत होते. यापैकी कुणीही मास्क घातलेला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीचा कॅमेरा जप्त केला.

Advertisement

नववधू, व्हिडीओग्राफर तसेच गाडीतील इतरांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोविड उपाययोजना कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Advertisement