ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीडशे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीकएंडचे नियम कठोर केले असताना आणि गर्दी जमवू नका, असे सांगितले असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या उद्‌घाटन समारंभाला मोठी गर्दी जमली.

त्यात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली. पवार यांना माफी मागावी लागली. आता पोलिसांनीही त्यावरून कारवाई सुरू केली असून दीडशे जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पवारांची नाराजी :- शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन झालं.

या वेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत कोरोनाच्या नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केलं होतं.

या प्रकरणावर अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त करत कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

शहराध्यक्षांसह पदाधिका-यांवर गुन्हे :- राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक नीलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे,

माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्यासोबत 150 महिला आणि पुरुष पदाधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इच्छुकांचे शक्तीप्रदर्शन :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनीही या वेळी शक्तीप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांनी कुठेही गाड्या लावल्याने डेंगळे पुलाच्या परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

परवानगी दीडशेची, उपस्थिती पाचशे :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश हांडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधीत कार्यक्रमास परवानगी मिळण्यासाठी अर्ज दिला होता.

अर्ज सादर करताना हांडे यांनी कोरोना संसर्ग असल्याने प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे कार्यकर्ते पालन करतील.

कार्यक्रमास 100 ते 150 जण उपस्थित राहतील, असे अर्जात नमूद केले होते. प्रत्यक्षात मात्र कार्यक्रमस्थळी 400 ते 500 कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काही कार्यकर्त्यांनी मुखपट्टीही घातली नव्हती.

You might also like
2 li