ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

कथित अध्यात्मिक गुरूंविरोधात जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा

पुणे पोलिसांनी पुण्यातील बाणेरचा कथित गुरू रघुनाथ येमुल याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मागणीनुसार जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात जादूटोणा प्रकार झाल्याचे महाराष्ट्र अंनिसने निदर्शनास आणू दिले होते.

जादूटोण्याचा प्रकार

आरोपी रघुनाथ येमुलने सांगितल्यानुसार संबंधित पीडित महिलेशी कुटुंबीय नातेवाइक यांनी जादूटोणा केला होता. कुटुंबीय, नातेवाइकांनी त्या महिलेला शारीरिक, मानसिक त्रास, शिवीगाळ, अश्लील भाषेचा वापर, आर्थिक पिळवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे.

येमुल याच्यासह नऊ आरोपींच्या विरोधात पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्यात हुंडा प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड विधान संहिता, कलम 498 अ आदी कलमाद्वारे गुन्हा दाखल झाला.

त्यानंतर त्यांना अटक झाली; मात्र महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर शाखेने संबंधित आरोपींवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी संबंधित आरोपींवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

तक्रार करण्याचे आवाहन

तथाकथित गुरूने याही अगोदर अनेकांना अशाप्रकारे अंधश्रद्धेचे प्रकार करून फसविले असणार आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रसारमाध्यमांद्वारे फसवणूक झालेल्या लोकांना संबंधित गुरू विरोधात तक्रार देण्यासाठी आवाहन करावे, अशी मागणी अंनिसने केली.

पोलिसांचे अभिनंदन

या प्रकरणावर बोलताना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, “ज्योतिषशास्त्र विषारद असल्याता दावा करणाऱ्या येमुल गुरुजी नावाच्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे.

एका राजकीय नेत्याला यशस्वी होण्यासाठी बायकोला पांढऱ्या पायाची म्हणत लिंबू मिरची उतरवायला लावलं. त्यातून कौटुंबिक हिंसाचारही घडला. पुणे पोलिसांचं पहिल्यांदा आरोपींवरील कारवाईसाठी अभिनंदन.

 

 

You might also like
2 li