आषाढी एकादशीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड परिसरातील लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे.

अत्यावश्यक सेवेतील वाहने, डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, रुग्णवाहिका या सेवांना जमावबंदीमधून वगळण्यात आले आहे. तसेच देहूगाव, आळंदीमधील स्थानिक नागरिकांजवळ ओळखपत्र असेल तरच प्रवेश मिळणार आहे.

कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूर येथे घेऊन जाण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

Advertisement

या कार्यक्रमादरम्यान गर्दी होऊ नये तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मंदिर परिसरात जमावबंदी

लागू करण्यात आलेल्या आदेशानुसार देहूरोड, निगडी, पिंपरी, भोसरी, आळंदी व दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील मार्गावर तसेच देहू, आळंदी मंदिर व आजूबाजूच्या परिसरात 19 जुलै या दिवशी पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी असेल.

महापूजेचा मान कोलते दांपत्याला

दरम्यान, आषाढी वारीच्या महापुजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दांपत्याला मिळाला आहे.

Advertisement

गेल्या 20 वर्षापासून ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. हे दांपत्य वर्धा जिल्ह्यातील आहे. मंदिरातील सहा विणेकऱ्यांमधून चिट्टी टाकून मानाचा वारकरी निवडण्यात आला.

कोरोना संसर्गामुळं वारी पांरपारिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं होण्याऐवजी नियमांसह होत असल्यानं मानाचा वारकरी निवडण्याची परंपरा बदलण्यात आली आहे.

वाखरी पालखी तळाची तयारी पूर्ण

20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून दहा संतांच्या मानाच्या पालख्या या सर्वप्रथम वाखरी येथील पालखीतळावर येणार आहेत. या ठिकाणी दहा पालख्यांना थांबण्यासाठी दहा मंडपाचे काम सुरू आहे.

Advertisement

प्रत्येक पालखीतील चाळीस वारकऱ्यांना थांबण्याची आणि भोजनाची सोय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून येथे केली जाणार आहे.

तसेच बॅरिकेटींग, स्वच्छता, विद्युतव्यवस्था, स्वछतागृहे, आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय व्यवस्था, वॉटरप्रुफ मंडप आदी व्यवस्था पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यानी दिली आहे.

 

Advertisement