खासदार उदयनराजे यांचा गुंड म्हणून उल्ले्ख केल्यानं त्याची ‘शिक्षा’ उद्योजकाला मिळाली. त्याला दमदाटी करून काळे फासण्याचा प्रकार इंदापुरात घडला. उदयनराजे समर्थकांनी हा गोंधळ घातला.

कपडे फाडून काढली धिंड

उदयनराजे यांच्या समर्थकांची दादागिरी इंदापुरात पाहायला मिळाली आहे. उदयनराजेंना गुंड संबोधणाऱ्या एका उद्योजकाला त्यांच्या समर्थकांनी काळं फासल्याची घटना इंदापूर घडली. अशोक जिंदाल असं या उद्योजकाचं नाव आहे.

इंदापूर एमआयडीसीमध्ये त्याची एक कंपनी आहे. या उद्योजकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तो उदयनराजे यांचा उल्लेख गुंड असा करताना पाहायला मिळत आहे.

त्यावरून शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या उद्योजकाला काळ फासलं, त्याचे कपडे फाडले आणि त्यांची धिंडही काढली.

त्यानंतर शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या उद्योजकाला पोलिस ठाण्यात घेऊन जात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

कायदा हातात घेण्यामुळे नाराजी

उद्योजकाचे भर रस्त्यात धिंड काढणे, त्याचे कपडे फाडणे आदी प्रकारामुळे उदयनराजे समर्थकांविरोधात नाराजी आहे. उद्योजक चुकला असेल, तर त्याविरोधातत गुन्हा दाखल करता आला असता; परंतु कायदा हातात घेण्याच्या प्रकारामुळे नाराजी आहे.