कायदा पाळण्याची ज्यांची जबाबदारी असते, त्यांनीच कायदा हातात घेतला, तर कारवाई कुणी करायची, असा प्रश्न निर्माण होतो. एक महिला पोलिस अशीच नियम दाखवून देणा-या गृहरक्षक दलाच्या जवानाशी अरेरावीने आणि उर्मटपणे बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नियमांचे उल्लंघन करूनही उलट अरेरावी
कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली असली तरी अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.

त्यापेक्षाही जास्त त्रास पोलिस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना (होमगार्ड्सना) त्रास होत आहे. कोरोना नियम मोडूनसुद्धा लोक त्यांच्याशी हुज्जात घालत आहेत.

Advertisement

तसे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र, यावेळी एक वेगळाच व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये अत्यंत महागड्या गाडीत बसलेल्या एका महिलेने कारोना नियमांचे उल्लंघन केले आहे.

ही महिला पोलिस असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महिलेने होमगार्ड जवानाशी अत्यंत उर्मट भाषेत संभाषण केले आहे.

दांडेकर पूल परिसरातील घटना
हा प्रकार पुण्यातील दांडेकर पुलाच्या परिसरातील आहे. दांडेकर पूल परिसरात लोकांची तसेच वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी होमगार्ड्सना बंदोबस्तावर ठेवण्यात आले आहे. होमगार्ड बंदोबस्तावर असताना याच पुलावरुन प्रवास करण्यासाठी एका महागड्या कारमधून ही महिला आली.

Advertisement

होमगार्डसारखे राहण्याचा सल्ला
सध्या कारमधून चार जणांना सोबत प्रवास करण्याची परवानगी नाही, तरीदेखील या महिलेच्या कारमध्ये एकूण चार जण बससेले होते. त्याबद्दल विचारणा केली असता कारमधील कथित महिला पोलिसाने होमगार्डशी वाद घालणे सुरू केले.

या महिला पोलिसाने अपमानकारक भाषा वापरत होमगार्डला थेट आरेतुरे केले. तसेच ‘खाकी ड्रेस घातला म्हणजे काय पोलीस झाला का ? होमगार्ड आहेस, होमगार्डसारखेच राहा’ अशा शब्दांत या महिला पोलिसाने धमकी दिली.

Advertisement