जम्मू-काश्मीरच्या बांदीपाेरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दाेन दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला. या दहशतवाद्यांकडे माेठ्या प्रमाणात शस्त्रे व दारूगाेळा हाेता. ताे जप्त करण्यात आला. दाेन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.

त्याला स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात आले हाेते. ताे जुलै २०२० मध्ये भाजप नेता शेख वसीम बरी, त्यांचे वडील उमर सुल्तान, भाऊ बशीर अहमद शेख यांच्या हत्येमध्ये सामील हाेता, अशी माहिती काश्मीरचे महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.

अन्य एका दहशतवाद्याला पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले हाेते. दाेन्ही दहशतवादी लष्कर-ए-ताेयबाचे सदस्य हाेते. बांदीपाेराच्या वटरीना भागात दहशतवादी दडून बसल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार कारवाई केली. त्यात दहशतवाद्यांनी गाेळीबार केला.

Advertisement

त्यानंतर सुरक्षा दलाने त्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले. परंतु दहशतवाद्यांचा गाेळीबार सुरू हाेता. चकमकीत दहशतवादी ठार झाले. जम्मू-काश्मीरचे अध्यक्ष रवींद्र रैना यांनी या कामगिरीबद्दल सुरक्षा दलास नमन केले. ते म्हणाले, भाजप नेते वसीम बारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा सूड घेण्यात आला आहे. देशाच्या विराेधात कट करणाऱ्या दहशतवाद्यांंचा असाच खात्मा होईल.