पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Ganpati) हे पुणेकरांचे आणि भक्तांचे लाडके आराध्य-दैवत! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Ganpati) म्हणजे पुणे शहराच्या (pune) गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Dagdusheth Ganpati) हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.

त्यामुळे बाहेरगावाहून पुण्यात आलेला व्यक्ती दगडूशेठच्या दर्शनासाठी गेला नाही असे फारच क्वचित घडत असावे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीने जगभरात नावलौकिक संपादन केला आहे.

दरम्यान, याच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन बॉलीवूड अभिनेता अभिषेक (abhishek bachchan) बच्चन यांनी काल म्हणजेच, मंगळवारी सकाळी घेतलं आहे. यावेळी अभिषेक बच्चन आतिशय प्रसन्न असल्याचे दिसून आले.

तसेच, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अभिनेता अभिषेक बच्चन (abhishek bachchan) यांचे स्वागत करण्यासोबतच श्रीं ची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी, सिद्धार्थ गोडसे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती देखील जाणून घेतली.

जया बच्चन यांची ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती’वर अतूट श्रद्धा.!

अभिनेत्री-खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) अनेकदा पुण्यातील ‘दगडूशेठ हलवाई’ला (Dagdusheth Ganpati) भेट देतात. ती प्रत्येक खास प्रसंगी या मंदिराला भेटायला येते. जेव्हा जया बच्चन पुण्यातील FTII येथे शिक्षण घेत होत्या तेव्हा देखील त्या गणपतीच्या दर्शला येत होत्या.

एवढेच नाही तर ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अंतर्गत दुखापतीमुळे अमिताभ बच्चन जीवन-मरणाची लढाई लढत असतानाही जया (Jaya Bachchan) या मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. स्वतः अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी हा खुलासा केला होता.