मुंबई – पटियाला न्यायालयाने गुरुवारी पंजाबी गायक ‘दलेर मेहंदी’ला (Singer Daler Mehndi) तुरुंगात (Jail) पाठवले आहे. 2003 मध्ये दलेर मेहंदी (Daler Mehndi) आणि त्याचा भाऊ शमसेर सिंह यांच्यावर मानवी तस्करीचा (human trafficking case) आरोप होता. या प्रकरणी त्यांना दोन वर्षे तुरुंगवास (Jail) भोगावा लागला होता. मात्र, या निर्णयाला त्यांनी पटियाला न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर गुरुवारी सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत न्यायालयाने दलेर मेहंदीला (Daler Mehndi) अटक करून कारागृहात (Jail) रवानगी केली.

दरम्यान, हे प्रकरण 2003 चे आहे. दलेर मेहंदी (Daler Mehndi) आणि त्याचा भाऊ शमसेर सिंग यांच्यावर मानवी तस्करीचा आरोप आहे. दोघांविरुद्ध अमेरिकेत 31 गुन्हे दाखल आहेत.

दोघांवर आरोप आहे की ते लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवून (human trafficking case) मोठ्या प्रमाणात पैसे घेत असत.

या प्रकरणी न्यायालयाने 15 वर्षांनंतर म्हणजेच 2018 मध्ये गायकाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

मात्र त्याचवेळी दलेर मेहंदीला जामीन मिळाला. दलेरच्या वकिलाने या निर्णयाला पटियाला न्यायालयात आव्हान दिले,

त्यानंतर न्यायालयाने गुरुवारी हा निर्णय कायम ठेवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एचएस ग्रेवाल यांनी गायकाला तुरुंगात पाठवले.

या प्रकरणात बुलबुल मेहता यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्याचवेळी शमशेर सिंग आणि ध्यानसिंग यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक दलेर मेहंदी हे शोसाठी परदेशात गेल्यावर बेकायदेशीरपणे 10 लोकांना अमेरिकेत घेऊन गेल्याचा आरोप आहे.

यानंतर 19 सप्टेंबर 2003 रोजी दलेरचा भाऊ समशेर याच्यावर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या कटात दलेर मेहंदीचाही सहभाग असल्याचे चौकशीत उघड झाले.