वडील, भावाचं निधन झाल्यानं त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून एका युवकानं स्मशानभूमीत एका युवकानं तीन मांत्रिकांना बोलवून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दिव्याची मांडली आरास

मलकापूर शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवासी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे आणि भावाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांची आत्मशांती झाली नाही, म्हणून त्याच्या घरात शांतता भंग पावली, असा त्याचा समज झाला.

त्यावर उपाययोजना म्हणून आशिषनं यानं तीन मांत्रिकांना स्मशानभूमीत पाचारण केले. त्यांच्या उपस्थितीत चक्क दिव्यांची आरास मांडली. तसेच मंत्रोच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार केला.

Advertisement

नागरिकांची स्मशानभूमीत प्रचंड गर्दी

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी मातामहाकाली परिसरात पसरली. त्यामुळे नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात एकच गर्दी केली; मात्र या प्रकाराने संपूर्ण परिसर चांगलाच हादरला.

तब्बल दोन तास मांत्रिकांचे प्रेतांसोबत संभाषण सुरू होतं, असा दावा केला जातो. संबंधित प्रकार असंख्य नागरिकांनी बघितला; मात्र भीतीपोटी कुणी पुढे जाण्यासाठी धजावलं नाही.

आशिष आणि तीन मांत्रिकांना बेड्या

या घटनेची माहिती नागरिकांनी कळवताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आशिष गोठीसह त्या तीन मांत्रिकांना ताब्यात घेतल्यानंतर हादरलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

Advertisement

संबंधित प्रकार हा अतिशय गंभीर असून याप्रकरणी पोलिसांनी जादूटोणा कायद्यांअंतर्गत कारवाई करणे अपेक्षित आहे, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं व्यक्त केलं.

 

Advertisement