पुणे – शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली असून, यामध्ये आता दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेत झालेल्या या अभूतपूर्व फुटीचे सावट यंदाच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू आले आहे.

नुकतंच, शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन गटांच्या दसरा मेळाव्यात काल जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मोठा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही बाजूंकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती.

पोलिसांच्या अंदाजानुसार, शिंदे गटाच्या मेळाव्यात सुमारे एक लाख 25 हजारांच्या आसपास लोकांनी हजेरी लावली होती. तर ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात सुमारे 65 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेच्या आणि शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्यावर आता सर्वच राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अश्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

“मी दसरा मेळाव्यात झालेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांचीही भाषणे ऐकली. मात्र, काहींची भाषणं नको तितकी लांबली असे म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

अजित पवार पुढे म्हणाले, “आता शिवसैनिकांनी निर्णय घ्यायला हवा. आपली पुढची भूमिका काय असायला हवी. कोणाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, कोणाची मुळ शिवसेना आहे’, याबाबत विचार करावा असेही अजित पवार म्हणाले.

दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी रुपये खर्चून बसेसची व्यवस्था केली होती. परंतू, त्यामुळं सर्वसामान्य लोकांना एसटी मिळाली नाही असे म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटावर टीका केली.