पुणे – पुणे शहरात (pune) एक धक्कादायक प्रकार घडला असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या एका वृद्धाला उतारवयात डेटिंगचा (Dating) नाद चांगलाच नडला असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या वृद्धाला तब्बल सहा महिन्यांपासून १७ लाख रुपयांंचा चुना लागला आहे. ही व्यक्ती पुण्यातील (Pune) पॉप्युलरनगर मध्ये राहत आहे.

याबाबत गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. पुण्यातील वारजे परिसरात ही घटना (crime) घडली असून याप्रकरणी सायबर पोलिसांत (Police) तक्रार देण्यात आली आहे.

डेटिंगसाठी (Dating) मुलगी हवी आहे का? असं या नागरिकाला विचारण्यात आलं होतं. त्यावेळी नागरिकाने महिलेकडे फोटोची मागणी केली होती. त्यानंतर महिलेने महिलेने नागरिकाला तब्बल १७ लाखांचा गंडा घातला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डिसेंबर २०२१ पासून जून २०२२ दरम्यान घडली. फसवणूक झालेले ७९ वर्षीय वयोवृद्ध हे बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना डिसेंबर महिन्यात एका अनोळखी नंबरवरून श्रेया नावाच्या मुलीचा फोन आला.

तुम्हाला डेटिंगसाठी (Dating) मुलगी हवी आहे का? अशी विचारणा केली. यावर वृद्धाने हाेकार दिल्यानंतर त्या तरुणीने या ज्येष्ठ व्यक्तीस काही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. पैसे भरण्यासाठी काही नंबरही दिले.

रक्कम भरल्यानंतर या वृद्ध व्यक्तीला नेहमीच त्या नंबरवरून फोन येत होते. सुमारे सात महिन्यांपासून हा वृद्ध डेटिंगच्या माेहाने पैसे भरत राहिला.

असे करत ६ महिन्यांत या वृद्ध व्यक्तीने आरोपी तरुणीच्या बँक खात्यात तब्बल १७ लाख रुपये भरले तरीही डेटिंग हाेत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

सदर महिला वेगवेगळ्या कारणावरुन सहा महिने पैसे मागत असल्याचंही ज्येष्ठ नागरिकाने सांगितलं आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपस करत आहे.