हडपसर : झोपडपट्टी सुरक्षा दलाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक दत्ता कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आ.) गटात प्रवेश केला.

रिपाइं पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव, रिपाइं नेते परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश देण्यात आला.

रामटेकडीमध्ये प्रथमा इमारतीसमोर घेतलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास पुणे शहरातील रिपाइं कार्यकर्ते माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे, अशोक शिरोळे, आशिष गांगुर्डे, युवक शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण,

Advertisement

मोहन जगताप, महिला अध्यक्षा शशिकला वाघमारे, मीना गालटे, मिनाज मेमन, संतोष खरात, रामभाऊ कर्वे, दीपक ईसावे, महादेव कांबळे, आशिष आल्हाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते. रामटेकडी येथील दत्ता कांबळे, अनिल देडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रिपाइंमध्ये प्रवेश केला.