इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी भरसभेत मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता. मात्र ही चूक लक्षात येताच त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा उल्लेख केला आहे.

दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत इंदापूर (Indapur) शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (People’s Republican Party) महाराष्ट्र (Maharashatra) राज्याचे युवक अध्यक्ष संजय सोनवणे (Sanjay Sonawane) यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान चुकून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता.

मात्र यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी तात्काळ दत्तामामांना त्यांची चूक लक्षात आणून दिली आहे.

Advertisement

तेव्हा भरणे यांनी चूक सुधारत सतत डोक्यात खूप विचार सुरु असल्याने होते असे कधीकधी, असे म्हणत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्री पद तसेच इंदापूर तालुक्याचे आमदार पद आहे. मात्र असे असूनही त्यांना मुख्यमंत्र्याच्या नावाचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मोठी शोकांतिका असल्याची चर्चा इंदापूरच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दत्तामामा इंदापूरचे आमदार होते आणि त्यावेळी फडणवीसांनी इंदापूरसाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी दिला आहे.

Advertisement

त्यामुळेच भरणेंच्या तोंडी आजही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे नाव आले असेल, अशीही चर्चा इंदापूर तालुक्यात रंगत आहे. तर दुसरीकडे माणूस आहे, त्यात दत्तामामांच्या मागे मोठा व्याप आहे. त्यामुळे झाली असेल चूक, असेही इंदापुरातील लोक म्हणत आहेत.

 

Advertisement