अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड महविश हयात हिला पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याचे वेद लागले आहेत.

इम्रान खान यांनी ज्या पद्धतीनं क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाकिस्तानात सत्ता मिळविली, तशी सत्ता आपण मिळवू शकतो, असं तिला वाटतं.

इम्रान खानच्या व्यक्तीमत्त्वाची तिच्यावर छाप आहे. इम्रान सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती सुधारली, असं तिला वाटतं.

इम्रान खान यांचं सरकार पाकिस्तानी जनतेच्या मनातून उतरलं आहे. सरकार सर्वंच बाबतीत अपयश ठरलं असलं, तरी तिला मात्र तसं वाटत नाही.

दाऊदची ही गर्लफ्रेंड महविश हयात म्हणते, की क्रिकेटपटू पंतप्रधान होत असेल, तर अभिनेत्रीही होऊ शकते. देशात बदल घडवून आणण्यासाठी राजकारणात यायची इच्छा तिनं व्यक्त केली आहे.

इम्रान खान यांच्यामुळं प्रभावित असलेली महविश आता त्यांना आव्हान द्यायचं नाही, असं एकीकडं म्हणत असली, तरी इम्रान यांची जागा कुणाला तरी घ्यावीच लागेल, असं सांगून अप्रत्यक्षरीत्या त्यांनाच आव्हान द्यायला निघाली आहे.

नवीन पक्ष स्थापन करायचा, त्याला निवडून आणायचं आणि पंतप्रधान व्हायचं हे स्वप्न पूर्ण होईल, की नाही ते काळच ठरवील, असं ती सांगते.

हयातसोबतचे दाऊदचे संबंध उघड झाल्यानंतर तो खूप संतापला आहे. ही माहिती बाहेर कशी समजली, याचा तो शोध घेत आहे.

महविश ही अवघ्या २७ वर्षांची असून ती दाऊदची सर्वात मोठी कमजोरी आहे. दाऊदच्या आदेशानुसार, तिला ‘तमगा-ए-इम्तियाज’ हा नागरी सन्मान देण्यात आला.