मुंबई : भाजप (BJP) आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंवर मानसिक परिणाम झाला असल्याचेही रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत.

डोंबिविलातील (Dombiwili) एका कार्यक्रमात बोलताना रवींद्र चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे (Shivsena) २०२४ चे लक्ष दिल्ली असल्याचा सूचक इशारा कार्यक्रमात बोलताना दिला होता.

Advertisement

भाजप आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीत पर्यटनासाठी आले होते, त्यांनी पर्यटनाचा आनंद लुटला पाहिजे होता. मात्र हल्ली त्यांना दिवसाढवळ्या स्वप्न पडायला लागली आहे.

२०२४ ला पुन्हा सत्तेत येणार त्यांचा हा जो म्हणण्याचा अर्थ होता, तो त्यांनी पुन्हा एकदा तपासून पाहिला पाहिजे. त्यांच्यावर काहीतरी मानसिक परिणाम झालेला आहे, असे मला वाटते असा घणाघाती टोला चव्हाणांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

Advertisement

कल्याण डोंबिवलीमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. एमआयडीसी येथील कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी राज्यात आपल्या सरकारच्या काळात विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणे शक्य झाले.

दिल्लीतून देखील विकासासाठी निधी आला पाहिजे, असे बोलताना २०२४ नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल, असं सूचक वक्तव्य करत शिवसेनेचे २०२४ चे लक्ष दिल्ली असल्याचा सूचक इशारा दिला होता.

Advertisement