बीड : जिल्ह्यातील मुलींच्या घटत्या जन्मदरावरून (Birth Rate Of Girls) राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुलींच्या जन्मदर वाढवण्यासाठीचे प्रयत्न करूया असे आव्हान पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, २००९ राज्यात (State) मुलींचा जन्मदर सर्वात कमी होता. त्यावेळी मी सुरुवातीला एनजीओच्या (NGO)  माध्यमातून आणि नंतर पालकमंत्री म्हणून खूप काम केले होते.

पहिली योजना मुलींचा जन्मदरवाढवण्यासाठी योजन सुरू केली त्यामुळे बीडमध्ये १००० मुलांमागे ९६१ मुलींची संख्याा वाढली होती. आता जिल्हयात पूर्वीसारखीच स्थिती निर्माण झालीय, या प्रकारावर पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, आता हे प्रमाण ज्या ठिकाणाहून सुरू झाले होते त्याच ठिकाणी परत गेले आहे. हे काम आताच्या या कारभारामुळे झालेले आहे. त्यांचा मी तीव्र निषेध व्यक्त करते, तीव्र नापसंती व्यक्त करते आणि मनापासून दुःख व्यक्त करते.

बीड जिल्ह्यात पीसीपीएनडी (PCPND) अ‌ॅक्टचा वापर होत नाहीय. बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी झाल्याचे दिसून येत आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुलींचा जन्मदर नाकारला जात आहे.

कुठेतरी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि त्यामध्ये याच्यावर कोणाचाही वचक आणि अंकुश राहिलेला नाही. मी याचा तीव्र निषेध करते. नाव न घेता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) टोला लगावला आहे

Advertisement

पंकजा मुंडे यांनी माझ्या बीड जिल्हा वासियांना बेटी बचाव बेटी पढाव या योजनेला खूप छान प्रतिसाद देण्याचं आवाहन केले.

बेटी बचाव बेटी पढाव योजनेत प्रबोधन, जागरण, जागृती करण्याची गरज आहे. त्याबद्दल सर्वांनी भाग घ्या, हे बीड जिल्ह्याचे चित्र कधी आपल्याला दिसले नाही पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे आव्हान पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Advertisement