पुणे – शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (deepali sayyad) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यात तुतु..मीमी.. पाहायला मिळत आहे. यावरून त्यांच्यात थोडे नाराजीचे वातावरण असल्याचे दिसत आहे. या दोघांमध्ये काही प्रमाणात शाब्दिक चकमक झाल्याचेही पाहायला मिळाले आहे. राऊत हे नेहमीच बंडखोर नेत्यांवर निशाणा साधत असतात. मात्र दीपाली सय्यद (deepali sayyad) यांनी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मध्यस्थी व्हावी, अशी विधाने केली आहे.

त्यावरून संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया देताना दीपाली सय्यद या शिवसेनेच्या प्रवक्त्या नाहीत, असे मत मांडले होते. त्यावरूनच दीपाली सय्यद यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना टोला लागवला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी राऊतांनी शांतता घ्यावी, असा सल्ला देखील दिला आहे. ‘मी एक शिवसैनिक आहे आणि प्रत्येक शिवसैनिकाला भावना व्यक्त करायचा अधिकार आहे.

त्यामुळे माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही’., असे प्रत्युत्तर सय्यद यांनी राऊतांना दिले आहे.

‘हे तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावं, हीच माझी इच्छा आहे. असेही त्या यावेळी म्हणाल्या. याचबरोबर पुढे बोलताना दिपाली सय्यद यांनी संजय राऊत यांना संयमाचा सल्ला दिला आहे.

राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची ती शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात.

त्यामागे त्यांचा हेतू फक्त शिवसेनेला सपोर्ट करायचा असतो. पण राऊतांनीही शांतता घ्यावी आणि त्यांनीच पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्रित आणावं, असं आवाहन दिपाली सय्यद यांनी केलं.