मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली असून, यामध्ये आता दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

यादरम्यान दोन्ही गटांमध्ये पक्षप्रवेश सुरु असून आपली बाजू भक्कम असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayyad) लवकरच शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. नुकतंच याबद्दल दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी एक सूचक विधान देखील केलं आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि त्याआधीही दीपाली सय्यद (Deepali Sayyad) प्रचंड सक्रीय झाल्याचं चित्र दिसत होतं. अनकेदा त्यांनी विरोधकांवर जाहीरपणे टीका केली असून, सडेतोड उत्तरही दिलं. ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठीही त्या प्रयत्न करत होत्या.

पण पक्षात सुषमा अंधारे (sushma andhare) यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत. याचं नेमकं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी ‘मी स्क्रीनवर येऊन तू-तू मै-मै करत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली,” असं सांगितलं.

नेमकं दीपाली सय्यद काय म्हणाल्या…

“जेव्हा गरज होती तेव्हा मी बोलले. पण आता सतत टीव्ही स्क्रीनवर येऊन तू-तू, मै-मै करणं गरजेचं नाही. मी सध्या लोकांची कामं करतेय. बोलण्याइतकंच काम करणंही गरजेचं आहे. ते मी सध्या करतेय, असं दीपाली म्हणाल्या.

दरम्यान, यावेळी त्यांना तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह आहात का? असं विचारण्यात आलं असता मी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचं त्यांनी म्हटलं.

सुषमा अंधारे यांच्या येण्याने दिपाली सय्यद (Deepali Sayyad) बॅकफुटवर आल्याचं बोललं जातंय. त्यामुळे दीपाली सय्यद या शिंदेगटाचा मार्ग स्विकारतील, अशी चर्चा सध्या होत आहे.