Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मोक्कांतर्गत जामिनावर सुटलेल्या आरोपीची जंगी मिरवणूक

तुरुंगातून सुटलेल्या गजा मारणे याची जंगी मिरवणूक काढण्याचा विषय काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला होता.

न्यायालयाच्या आदेशानुसार मारणे व त्याच्या सहका-यांवर कारवाई करण्याचा विषय ताजा असतानाच आता कल्याणमध्येही एका आरोरीची जंगी मिरवणूक काढण्याचा प्रकार घडला.

कोरोनाचे नियम पायदळी

मोक्का अंतर्गत शिक्षा भोगणारा आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

या वेळी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले. टिटवाळाजवळील वरप गावात या सर्व प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गुन्हा दाखल

कल्याणमध्ये एक मोक्कातंर्गत शिक्षा भोगणारा आरोपी जेलमधून सुटला. या वेळी त्या आरोपीच्या मित्रांनी त्याची जंगी मिरवणूक काढली.

कल्याण वरप परिसरात ही जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत एकच जल्लोष करण्यात आला. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a comment