Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची झाडाझडती

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्या नंतर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केल्यानंतर केलेले असताना न्यायालयाने मंगलदास बांदल यांना एक जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मंगलदास बांदल यांच्या बंगल्याची झाडाझडती करण्यात आली आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या रेखा मंगलदास बांदल, गोविंद शंकर झगडे,

मोहन जयसिंग चिखले (सर्व रा. शिक्रापूर) यांच्या सह एका अनोळखी इसमावर शिक्रापूर येथील दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या जागेतील गाळ्यांचे बनावट व्यक्ती उभी करून बोगस गहाणखत बनवून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.

Advertisement

याप्रकरणी बांदल यांना अटक केली होती. त्यांनतर मंगलदास बांदल यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने मंगलदास बांदल यांचा जामीन नामंजूर करत त्यांना एक जून २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्रापूर पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी व पोलीस तसेच कर्मचाऱ्यांची मदत घेत मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर व हडपसर येथील बंगल्यांची तसेच त्यांच्या शिक्रापूर येथील हवेली आणि येकाय कंपनीची झाडाझडती घेतली आहे, मात्र यावेळी केलेल्या झाडाझडतीमध्ये पोलिसांना काही जमिनींचे सात बारा उतारे मिळून आले आहे.

Advertisement
Leave a comment