कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. संपूर्ण जगातील शास्रज्ञ यावर लस शोधण्याचे कार्य करत आहेत. परंतुआता त्या लसींच्या प्रक्रियेबाबत सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे
. ‘ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने आम्ही करोनाच्या लशीच्या चाचण्यांवर काम करीत आहोत. सुरक्षा आणि त्याची परिणामकारकता यशस्वी झाल्यानंतरच सप्टेंबर – ऑक्टोबरपर्यंत ही लस बाजारात येऊ शकेल, अशी आमची अपेक्षा आहे.
क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्यास पुरेसे डोस उपलब्ध करण्यासाठी लशींचे उत्पादन करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली . सीरमने लस तयार करणाऱ्या सात जागतिक संस्थांपैकी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी लस प्रकल्पात भागीदारी केली आहे.
तेथील डॉ. हिल यांच्यासह आमच्या तज्ज्ञांचे पथक काम करत आहे. लसीच्या चाचण्यांमध्ये आवश्यक सुरक्षा आणि परिणामकारकता तपासून सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत बाजारात ही लस येऊ शकते.
इंग्लंडमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत क्लिनिकल चाचण्या यशस्वी होतील, या अपेक्षेने आम्ही लस तयार करणार आहोत. क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्यास पुरेसे डोस उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने उत्पादनाचा निर्णय घेतला आहे.
पुढच्या दोन आठवड्यांच्या कालावधीत आम्ही या लशीच्या भारतातही चाचण्या सुरू करणार आहोत,’ अशी माहिती पूनावाला यांनी दिली.