Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

लसीकरण न झाल्याने डेल्टा प्लस

मुंबईः लसीकरण किती महत्त्वाचे आहे, हे डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या लागणीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किमान कोरोनाच्या घातक विषाणूपासून वाचण्यासाठी तरी आता लसीकरण करणे गरजेचे आहे.

आरोग्य विभाग सतर्क

कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट या विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. या रुग्णांचे लसीकरण झाले नसल्यामुळं डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप अवाते हे या रुग्णांची अधिक माहिती गोळा करत आहेत. राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

सध्या या २१ रुग्णांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जात असतानाच या रुग्णांचे लसीकरण पूर्ण न झाल्याचं समोर आलं आहे.

तसंच, यातील तीन रुग्णांचं वय १८ वर्षाखालील असल्यानं ते लसीकरणासाठी पात्र नाहीत. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यातील लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलर्ट

राष्ट्रीय आरोग्य विभागाचे आयुक्त एन रामास्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या पाच जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत,

त्या राज्यात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यातील काही रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाली होती.

राज्यातील पहिला मृत्यू

कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा राज्यात पहिला मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यू झालेली व्यक्ती ८० वर्षांची होती. या व्यक्तीला इतरही काही आजार होते, अशी माहिती मिळत आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट काय आहे?

डेल्टा प्लस व्हेरिएंट हे कोरोना विषाणूचे बदललेले रूप आहे. हे रुप राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भारतात कोरोनाची दुसरी लाट निर्माण होण्याचे डेल्टा प्लस व्हेरिएंट हेच कारण होते.

लसीकरण हाच पर्याय

कोरोना विषाणूचा डेल्टा हा उत्परिवर्तित प्रकार अत्यंत संसर्गजन्य असून तो आतापर्यंत ८५ देशांमध्ये आढळला आहे आणि लसीकरण न झालेल्यांमध्ये त्याचा वेगाने प्रसार होत आहे,

असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेद्रोस अदहानम गेब्रेयेसस यांनी दिला आहे.

या विषाणूचा संसर्ग आणि त्यातून होणारे मृत्यू रोखण्याचा लसीकरण हा एकमेव परिणामकारक मार्ग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a comment